breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मेट्रोच्या ‘स्ट्रक्चरल ऑडीट’साठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्ती 

महामेट्रोने केला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडे खुलासा
पिंपरी (महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत पिंपरी ते दापोडी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु आहे. यामध्ये नाशिक फाटा याठिकाणी 5 जानेवारी रोजी पाइलींग मशिन कोसळून अपघात झाला होता. या अपघाताची चौकशी आणि ‘मेट्रोचे सेफ्टी स्ट्रक्चरल ऑडीट’ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी महामेट्रोकडे 8 जानेवारीला लेखी पत्राव्दारे केली होती. त्यानूसार मेट्रोने केलेल्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यास पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्ती केल्याचे लेखी कळविले आहे. 
यासंर्दभात महामेट्रोने वाकडकर यांना लेखी खुलाशाव्दारे कळविले आहे की, मेट्रोच्या कामाची गुणवत्ता व सुरक्षा याची तपासणी फ्रान्समधील ब्युरो वेरिटास या कंपनीकडून केली जाते. तसेच पुणे मेट्रोने केलेल्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्ती महामेट्रोने केली आहे. त्यानुसार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे काम सुरु आहे.
या प्रकल्पाचे काम सुरक्षितपणे प्रगती पथावर असून पुढील काळात कोणताही अपघात होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असे पुणे मेट्रोचे प्रकल्प कार्यकारी संचालक गौतम बि-हाडे यांनी कळविले आहे.  तसेच 5 जानेवारी रोजी झालेला अपघात हा मशिन चालकाचे मशिनवरील नियंत्रण सुटल्यामुळे झाला. या अपघाताची चौकशी महामेट्रोने पुर्ण केली असून दोन अभियंते व रिंग ऑपरेटर यांना निलंबित केले आहे. पाईल काम करणा-या कंपनीस पाच लाख रुपयांचा दंड महामेट्रोने केला आहे.
या अपघाताबाबत भोसरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. मेट्रो प्रकल्पाचे काम करताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुरक्षा उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच मेट्रो कामावर वापरण्यात येणा-या पाईल रिंग व क्रेनची तपासणी शासनमान्य संस्थेमार्फत करण्यात येते. मशिन ऑपरेटला ठराविक कालावधीने प्रशिक्षण देणे, सर्व मशिन चालकांची वैदयकीय तपासणी दर सहा महिन्यांनी वैद्यकीय अधिका-यामार्फत करणे, सर्व मशिन चालकांनी दररोज मशिन काम सुरु करण्यापुर्वी मशिन योग्य व सुरक्षित असल्याची खात्री करणे, तसेच सुरक्षिततेबाबत वरिष्ठ सुरक्षा अधिका-यांमार्फत माहिती व प्रशिक्षण देण्यात येते, अशीही माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांना लेखी पत्राव्दारे दिली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button