breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मूर्तीदान उपक्रमाला गणेश भक्तांचा प्रतिसाद; आठ हजार मूर्त्या जमा

पिंपरी – संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील पाच घाटांवर मूर्तीदान उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमाला गणेश भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळत अाहे. सकाळी आठपासून दुपारी चार वाजेपर्यंत तब्बल आठ हजार मूर्ती जमा करण्यात आल्या आहेत.

शहरातील वाल्हेकरवाडी, थेरगाव पूल, बिर्ला घाट, मोरया गोसावी मंदिर घाट, केशवनगर या घाटांवर यावर्षी संस्कार प्रतिष्ठानचा मूर्ती दान उपक्रम सुरू आहे. प्रतिष्ठानचे 300 स्वयंसेवक वरील घाटांवर उपस्थित आहेत. सर्व स्वयंसेवक गणेश भक्तांना मूर्तीदान करून गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने करण्यासाठी प्रेरित करीत आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. जमा केलेल्या सर्व मूर्त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button