breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुहूर्त ठरला ! 30 ‘मे’ला नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा

नवी दिल्ली, – नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेण्यासाठी त्यांच्या शपथविधी सोहळ्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता पार पडणार आहे. मोदींसोबत केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांचाही याच दिवशी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वतः नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. राष्ट्रपतींच्या ट्विटरवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button