breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मुस्लीम समाजाचेही आंदोलनाचे हत्यार

पूर्वीच्या सरकारने दिलेले 5 टक्‍के आरक्षण कायम ठेवा

पुणे – मराठा आणि धनगर समाजापाठोपाठ आता मुस्लीम समाजही आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. पूर्वीच्या सरकारने दिलेले 5 टक्के आरक्षण कायम ठेवत त्याची अंमलबजावणी करावी या आणि अन्य मागण्यांसाठी आता मुस्लीम समाज रस्त्यावर उतरणार आहे. मुस्लीम मूक महामोर्चा समन्वय समितीने सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यासंदर्भात समन्वय समितीचे सदस्य म्हणाले, आरक्षणाबरोबर मुस्लीम समाजाच्या इतरही मागण्या आहेत. याबाबत शासनाकडे निवेदन देऊनसुद्धा त्यांनी दखल घेतली नाही. याबाबत आता आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नसून दि. 9 सप्टेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. यात 5 लाखांहून अधिक समाजबांधव सहभागी होणार आहेत. हा मोर्चा सेव्हन लव्ह चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय मार्गावर काढण्यात येणार आहे. यासंदर्भात आमच्या चार बैठका झाल्या आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय आंबेडकरी व दलित पक्ष संघटनांनीसुद्धा या मोर्चाला सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे.

देशभरामध्ये मॉब लिचींग घटनांमध्ये तब्बल 78 पेक्षा जास्त जणांची हत्या करण्यात आली आहे. त्यातील आरोपींना फाशी द्या. मुस्लीम पर्सनल कायद्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये. वक्‍फ बोर्डाच्या जमिनीवरील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढावीत, दलित व मुस्लिमांवरील जातीय अत्याचाराच्या घटना रोखाव्यात, मुस्लीम समाजाला अॅॅट्रोसिटी कायद्याचे संरक्षण द्यावे या मागण्यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button