breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

मुलगी झाल्यास प्रसूती मोफत; पुण्यातील ऑक्सिकेअर हॉस्पिटलचा विधायक उपक्रम

पुणे – पिंपरी- काळेवाडी येथे नव्याने सुरू झालेल्या ऑक्सिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्माला आल्यास प्रसुती मोफत करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याद्वारे समाजाता ‘मुलगी वाचवा’चा संदेश दिला जात आहे. हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर बाळंपणाच्या पहिल्याच केसमध्ये मुलगी जन्माला आली. प्रसुती नैसर्गिक (सुक्षम) झाल्यास सुमारे २० हजार रुपये खर्च होतो. हॉस्पिटल प्रशासनाने संपूर्ण खर्च माफ केला. त्यामुळे संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी मुलीच्या जन्माचे आनंदात स्वागत केले .
विशेष  म्हणजे, पहिले बाळंतपण सिझेरियन केले असतानाही दुसरे अपत्य ‘नॉर्मल डिलिव्‍हरी’द्वारे झाल्यामुळे कुटुंबियांच्या आनंदात आणखी भर पडली. परिसरातील नागरिकांनी ऑक्सिकेअर हॉस्पिटलच्या ‘मुलगी वाचवा’ उपक्रमाचे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्याचे कौतुक केले आहे.
‘ऑक्सिकेअर’ घाटगे  यांनी सांगितले की, सुमारे २६ वर्षे वयाची महिला आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रसुतीपूर्व उपचारांसाठी दाखल झाली. तीन वर्षांपूर्वी संबंधित महिलेचे सिझेरियन झाले होते. तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलेची आरोग्य तपासणी केली. प्रसुतीसाठी नाव नोंदणी करुन घेण्यात आली. त्यानंतर संबंधित महिलेची प्रसुती ‘नॉर्मल’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. नियोजित वेळेनुसार, महिलेची शारीरिक तपासणी आणि रक्त-लघवीचे नमुने घेण्यात येत होते. दरम्यान, १४ एप्रिल रोजी संबंधित महिलेला आम्ही ‘एडमिट’ करुन घेतले. त्यानंतर आवश्यक औषधी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमद्वारे ‘मॉनेटरिंग’ करण्यात आले. दुपारी, ३.३५ वाजण्याच्या सुमारास संबंधित महिलेने मुलीला जन्म दिला. नवजात मुलीचे वजन ३.०७५ किलो इतके आहे. आई आणि बाळ दोघेही तंदुरुस्त आहेत. पहिल्या बाळासाठी ‘सिझेरियन’ झालेले असतानाही ‘नॉर्मल’ प्रसुती झाल्यामुळे महिलेच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.
या टीममध्ये प्रसुती तज्ज्ञ डॉ. पृथ्वीराज पवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. कपिल जाधव, हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रथम सोळंकी, डॉ. शेखर घाटगे यांच्यासह हॉस्पिटलमधील कर्मचा-यांनी काम पाहिले.
——
ऑक्सिकेअर हॉस्पिटलचा नवा आदर्श…
सध्या वैद्यकीय क्षेत्रातील अज्ञानामुळे अनेकदा आवश्यकता नसताना केवळ पैसे कमावण्याच्या हेतूने गरोदर महिलांची ‘सिझेरियन’व्दारे प्रसूती केली जाते. राज्यात गेल्या पाच वर्षात सिझेरियनचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. मात्र, काही डॉक्टर आणि रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांना वेठीस न धरता महिलेच्या प्रकृतीनुसार  नैसर्गिक प्रसुती करण्यावर भर देत आहेत. अशाप्रकारे पुणे, पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी परिसरातील ऑक्सिकेअर हॉस्पिटलने पहिले बाळंतपण ‘सिझेरिअन’ झालेल्या महिलेची दुसरी प्रसूती नैसर्गिक करून आदर्श निर्माण केला आहे.
——
नॉर्मल आणि सिझेरियन प्रसुती हे दोघंही मातेच्या प्रकृतीवर अवलंबून असते. आई आणि बाळ या दोघांच्या स्वास्थ्य चांगले राहावे याकरिता ऐनवेळी शस्त्र‌क्रिया की वाट बघायची हे ठरविले जाते. पूर्वी योग्य वयात विवाह होत असल्याने सिझेरियनचे प्रमाण कमी होते. मात्र, आता सिझेरियनचे प्रमाण वाढले आहे. तरीही आम्ही आई व बाळाच्या प्रकृतीनुसार नॉर्मल डिलिव्‍हरी करण्याचा प्रयत्न असतो. त्याला यश मिळाले आहे. तसेच, ‘मुलगी वाचवा’ या अभियानाद्वारे आमच्या हॉस्टिलमध्ये मुलगी झाल्यास मोफत प्रसुती केली जाते. जास्तीत-जास्त लोकांनी मुलीच्या जन्माचे स्वागत करावे, हीच अपेक्षा आहे.
– डॉ. शेखर घाटगे, संचालक, ऑक्सिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, काळेवाडी.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button