breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुख्यमंत्र्याच्या दाै-यात आंदोलन ; मारूती भापकर पोलीसांच्या नजरकैदेत

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेवक मारुती भापकर यांना पोलीसांनी नजरकैदत ठेवले आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहराच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उद्घाटन आणि प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे विविध प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून यावेळी प्रेक्षागृहाबाहेर मारुती भापकर जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करणार होते. मात्र सकाळीच पोलीस भापकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून त्यांना स्थानबध्द केले आहे.

पिंपरी-चिचवड शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रा. कै. रामकृष्ण मोरे प़ेक्षाग़हात विविध प़कल्पांचे उद्घाटन आज (बुधवारी) सायंकाळी ५ वाजता होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होणार आहे. भापकर म्हणाले की, या कार्यक्रमानंतर काही अंतरावर सुरक्षित स्थळी आम्ही शांततेने जनतेच्या विविध मुलभुत प़श्नाबाबत धरणे आदोलन करणार आहे.  याबाबत ८ जानेवारीला २०१९ रोजी आमच्या आंदोलनाचे निवेदन देण्यासाठी चिचवडगाव पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक प़दिप लोंढे यांच्याकडे गेलो, मात्र, त्यांनी आमचे निवेदन स्वीकारने ही कायदेशीर जबाबदारी लोढे यांनी ती टाळली. तुम्ही पोलीस सहआयुक्त मकरंद रानडे यांना भेटा असे उध्दट उत्तरे दिली. बुधवारी सकाळी पिपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक अन्सार शेख व पोलिसांनी झोपेत असतानाच मला माझ्या राहत्याघरी नजरकैद करुन ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस आयुक्त, सहआयुक्त, चिचवड, पिपरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा जाहीर निषेध त्यांनी केला. तसेच म्हतारी मेल्याचे दुख नाही, पण काळ सोकावण्याचा धोका ओळखुन सरकारच्या या हिटरलशाहीचा धिक्कार झालाच पाहिजे. असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button