breaking-newsआंतरराष्टीय

मुंबई हे भारतातील सर्वात महागडे शहर – मर्सर सर्वेक्षण

न्यूयॉर्क (अमेरिका) – मुंबई हे परदेशी लोकांसाठी भारतातील सर्वात महागडे शहर, तर हॉंगकॉंग हे जगातील सर्वात महागडे शहर असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. न्यूयॉर्कमधील ग्लोबल कन्सल्टिंग फर्म मर्सरने जीवनमान खर्चावरील सर्वेक्षणानंतर ही माहिती जाहीर केली आहे.

जगातील सर्वात महागड्या 207 शहरांच्या यादीत हॉंगकॉंग प्रथम क्रमांकावर, टोकियो दुसऱ्या, झुरिक तिसऱ्या, सिंगापूर चौथ्या, सेओल पाचव्या, शांघाय सातव्या, आणि बीजिंग नवव्या आणि बर्न दहाव्या क्रमांकावर आहे.

सन 2018 च्या राहणीमानानुसार भारतीय शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर असलेले मुंबई शहर जागतिक क्रमवारीत 55व्या क्रमांकावर आहे. मुंबईने मागील सर्वेक्षणापेक्षा दोन जागांची प्रगती केली आहे. मेलबोर्न (58), फ्रॅंकफर्ट (68), ब्यूनोस एयर्स(76) अशा प्रसिद्ध शहरांना मुंबईने मागे टाकले आहे. नव्या जागतिक क्रमवारीत भारतीय शहरांपैकी दिल्ली 103, बेंगळुरू 170, चेन्नई 144, कोलकाता 182 असे क्रमांक लागतात.

अन्न, मद्य आणि घरगुती उपकरणे यांच्या किमतीतील वाढीमुळे मुंबईच्या क्रमवारीत बढती झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. ही क्रमवारी ठरवताना क्रीडा, करमणूक, परिवहन, रियल इस्टेट आदी 200 गोष्टी विचारात घेण्यात आलेल्या आहेत. न्यूयॉर्क शहर पायाभूत शहर मानण्यात आले असून किमती डॉलर्सच्या तुलनेत घेण्यात आल्या आहेत,

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button