breaking-newsमुंबई

मुंबई : वरिष्ठ पोलिसाला धमकी आणि पाच महिला पोलिसांना मारहाण, आरोपीला अटक नाही

मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी आलेल्या महिलेने चक्क महिला पोलिसांनाच चोप दिल्याचा प्रकार घडला आहे. इतकंच नाह तर त्या महिलेने पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही धमकी दिली. या धक्कादायक प्रकाराने सक्षम पोलिसांची इभ्रत चव्हाट्यावर आली आहे. या प्रकरणी आरोपी महिला रेश्मा मलिक हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तिला अटक करण्यात आलेली नाही. तर आंबोली पोलीस मात्र तपास  सुरु असल्याचा सूर काढीत आहेत. या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यवाही आणि कार्यपद्धतीवर संशयाचे धुके पसरले आहे.

माहितीनुसार,  आरोपी रेश्मा मलिक आपण केलेल्या लेखी तक्रारींवर काय कारवाई झाली याबाबत माहिती घेण्यासाठी आंबोली पोलीस ठाण्यात आला होती. पोलीस ठाण्यात आलेल्या आरोपी रेश्मा मलिक यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांना भेटण्याची अनुमती मागितली. त्यावेळी पोलीस ठाण्यात दिवसपाळीत कर्तव्यावर असलेल्या सावनी सुबोध शिगवण यांच्यासह पोलीस निरीक्षक सरगर, महिला पोलीस शिपाई ज्योती पाडेकर उपस्थित होत्या. दुपारचे अडीच वाजले होते.  वरिष्ठ निरीक्षक भारत गायकवाड यांच्याकडे जाऊन रेश्मा मलिकने अर्ज दाखवीत विचारणा केली. मात्र काहीच कारवाई झाली नसल्याचे लक्षात येताच ती भडकली. तिने तुम्ही सगळे चोर आहे, तुम्ही गुन्हेगारांना पाळता, तुमच्यामुळे माझी प्रकृती बिघडली आहे. मी कुणालाही सोडणार नाही अशी धमकी दिली.

त्यावेळी उपस्थिती सर्व पोलीस कर्मचारी यांनी महिलेला शांत राहण्याचा सल्ला दिला. तर रेश्मा मलिक हिला पोलीस शिपाई ज्योती यांनी बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त महिलेने पोलीस ठाण्यातच पोलिसांच्या आया-बहिणींचा उद्धार केला. तेव्हा महिला पोलीस शिपाई ज्योती यांनी तिला बाहेर नेले असता ज्योतीला आरोपी रेश्मा मलिक हिने मारहाण केली. महिला शिपाई ज्योतीने रेश्माच्या कानाखाली मारली. हा सगळं प्रकार पाहून अन्य तीन महिला पोलीस शिपाई फापाळे, वाघमारे, आणि बच्छाव यांनी महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. तर आरोपी महिलेने मात्र महिला पोलीस शिपाई वाघमारे यांचे केस पकडले आणि पोटावर लाथा मारल्या, वाघमारे यांच्या मदतीला धावून आलेल्या बच्छाव यांनाही मारहाण केली. त्यानंतर अन्य एका महिला पोलिसालाही मारहाण करून शिवीगाळी केली. उपस्थिती सर्वांनीच महिलेला आवरण्याचा प्रयत्न केला मात्र ती एकण्याच्या मनःस्थितीत नव्हती.  एवढ्यावरच ती थांबली नाही तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांना अश्लील शिवीगाळी केली. आणि बघून घेईन अशी धमकी दिली. आरोपी रेश्मा मलिक हिला पोलिसांनी कूपर रुग्णालयात नेले, तिथेही मलिक यांनी तमाशा केला. रेश्मा मलिक यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात मारामारी आणि शिवीगाळी तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अद्याप अटक कारण्यात आलेली नसून पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button