breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत फ्लेमिंगोची संख्या १ लाख २१ हजारांवर

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सर्वेक्षणातील माहिती

मुंबईतील गुलाबी पाहुणे रोहित पक्ष्यांची (फ्लेमिंगो) संख्या आता एक लाख २१ हजापर्यंत पोहोचली आहे. यामध्ये लेसर फ्लेमिंगोची संख्या वाढलेली असून ग्रेटर फ्लेमिंगोची संख्या मात्र कमी झाली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने जानेवारी २०१९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली.

या सोसायटीने मुंबई परिसरातील फ्लेमिंगोवरील दीर्घकालीन पर्यावरणीय अभ्यास तसेच या पक्ष्यावरील विकासात्मक कामांचा प्रभाव समजून घेण्यासाठी मुंबईच्या पुर्वेकडील समुद्राची (शिवडी, न्हावा) निवड केली. या अभ्यासाचा मुख्य उद्देश पक्ष्यांचे समूह, मानवी हस्तक्षेपाचा परिणाम आणि पाणपक्ष्यांवरील प्रदूषणाचा प्रभाव हा होता. या अभ्यासाकरिता विटावा ते शिवडी आणि जेएनपीटी या दोन्ही किनाऱ्यांना एक किलोमीटरच्या त्रिज्यांमध्ये विभागण्यात आले. एका दिवसात संशोधक व सहाय्यकांच्या गटांनी बोटीतून सर्वेक्षण केले. गणनेत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून सलग तीन दिवस हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावरुन त्यांच्या संवर्धन व संरक्षणाचे उपाय केले जातात, असे या प्रकल्पाचे मुख्य अभ्यासक व बीएनएचएसचे सहाय्यक संचालक राहुल खोत यांनी सांगितले.

समुद्र किनारे स्वच्छ करण्याची गरज : या संपूर्ण सर्वेक्षणावरुन असे लक्षात येते की पुर्वेकडील प्रदूषित समुद्र किनारे स्वच्छ करण्याची गरज आहे. तरच फ्लेमिंगो व इतर स्थलांतरीत पक्ष्यांना प्रदूषणमुक्त अधिवास देता येईल. त्यांचा अधिवास सुरक्षित राखताना अधिक जबाबदार आणि संवेदनशिल असणे आवश्यक आहे, असे मत बीएनएचएसचे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button