breaking-newsमुंबई

मुंबईत आगीचे सत्र, लोअर परळ येथील इमारतीला आग

मुंबईत इमारतींना आग लागण्याचे सत्र सुरुच आहे. चेंबूरच्या टिळकनगरमधील इमारतीला आग लागल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी सकाळी लोअर परळ परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीला आग लागली. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सकाळी ७.३० च्या सुमारास ही आग लागली.

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Mumbai: Fire breaks out in an under construction building near Kamala Mills compound. 5 fire tenders at the spot

अग्निशमन दलाच्या पाच गाडया घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. कमला मिल कंपाऊंडसमोरच ही निर्माणाधीन इमारत आहे. योगायोग म्हणजे मागच्या वर्षी याच दिवशी कमला मिल कपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाला होता.

दोन दिवसांपूर्वी चेंबूरमधल्या रहिवाशी इमारतीला आग लागून पाच जणांचा मृत्यू झाला होता. लोअर परेल हा वर्दळीचा भाग आहे. इथे अनेक मोठया कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये आहेत. सकाळी साडेआठ-नऊपासून या भागात गाडयांची संख्या वाढण्यास सुरुवात होते. आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही तर या भागात वाहतूक कोंडीची समस्या उदभवू शकते. निर्माणाधीन इमारतीमध्ये आग नेमकी कशामुळे लागली ते अद्याप समजू शकलेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button