breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील कीर्ती व्यासची सहकाऱ्यांकडून हत्या

मुंबई – मुंबईतील बेपत्ता तरुणी कीर्ती व्यासची हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. कीर्तीच्या हत्येप्रकरणी तिच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मेमो दिल्याच्या रागातून दोघांनी कीर्तीचा जीव घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अंधेरी पश्‍चिम भागातील बीब्लंट सॅलॉनच्या शाखेत फायनान्स मॅनेजर म्हणून 28 वर्षीय कीर्ती व्यास कार्यरत होती. दरम्यान, गेल्या दीड महिन्यांपासून कीर्ती बेपत्ता होती.

याप्रकरणी कीर्तीच्या दोन सहकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, अद्याप कीर्तीता मृतदेह सापडलेला नाही. आरोपींच्या गाडीत रक्ताचे सुकलेले डागही आढळले होते. कीर्तीच्या पालकांची डीएनए टेस्ट केल्यानंतर ते रक्त कीर्तीचे स्पष्ट झाले. दरम्यान, ढिसाळ कामाबद्दल कीर्तीने आरोपीला मेमो दिला होता. या रागातून सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानी या दोघांनी कीर्तीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button