breaking-newsपुणेमुंबई

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल

मुंबई: मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉमध्ये कार्यरत होते. तर दत्ता पडसलगीकर यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे.
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल हे 1985च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. वादग्रस्त अधिकारी म्हणून जयस्वाल यांची ओळख आहे. तेलगी प्रकरणात त्यांच्या कामाबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने आर एस शर्मा यांना क्‍लीन चिट दिली तेव्हा जयस्वाल यांच्यावर ताशेरे ओढले होते. आर एस शर्मा, प्रदीप सावंत यासह काही अधिकाऱ्यांना जयस्वाल यांनी अटक केली होती. डीजी संजीव दयाळ जयस्वाल यांच्यासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे पोलीस प्रमुख सतीश माथूर आज सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी पोलीस दलामार्फत दिमाखदार सोहळयाने त्यांना निरोप देण्यात आला. त्यांच्या जागी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button