breaking-newsआरोग्यपुणेमहाराष्ट्र

“मिश्री’ वापरणाऱ्या महिलांना अॅॅनिमियाचा अधिक धोका

  • पुणे विद्यापीठामध्ये संशोधन : पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांकडून जास्त वापर

पुणे – महाराष्ट्रातील महिलांमध्ये अॅॅनिमियाचे (रक्ताल्पता) प्रमाण जास्त आहे. विशेषत: ज्या महिला तंबाखूचा वापर करतात. त्यांच्यामध्ये हे प्रमाण चौपट जास्त असल्याचे महत्त्वपूर्ण संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागामधील स्नातक डॉ. हेमलता शेडगे यांनी केले आहे. या महिलांकडून होत असलेला मिश्री किंवा मशेरीचा वापर हे यामागील प्रमुख कारण आहे.

मिश्री हा प्रकार महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांकडून मिश्रीचा वापर जास्त केला जातो, असे जागतिक तंबाखू सर्वेक्षणामध्ये नोंदविण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर मानवशास्त्र विभागामधील प्रा. शौनक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अभ्यासात शेडगे यांनी तंबाखूचा वापर न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत तंबाखूचा वापर करणाऱ्या महिलांचे वजन कमी असल्याचे दाखवून दिले आहे. याचबरोबर, या अभ्यासामध्ये तंबाखूचा वापर करणाऱ्या महिलांच्या नवजात शिशूंचे वजनही तुलनात्मकदृष्ट्या कमी आढळले. अशा महिलांच्या भुकेवर, त्यांच्या गर्भवती असताना वजनवाढीवर तंबाखूचा परिणाम होत असावा, अशी ठळक शक्‍यता या अभ्यासांती व्यक्त करण्यात आली आहे.

अभ्यासासाठी 591 महिलांची निवड

या अभ्यासासाठी पुण्यामधील दोन शासकीय व दोन खासगी रुग्णालयांमधील 591 महिलांची निवड करण्यात आली होती. या महिलांपैकी 140 अर्थात 23 टक्‍के महिलांच्या नवजात शिशुंचे वजन कमी आढळले. याचबरोबर, उच्चशिक्षित महिलांच्या तुलनेमध्ये अशिक्षित महिलांना रक्ताल्पता होण्याची शक्‍यता 9 पटीने अधिक आढळली. तंबाखू हा एक विषजन्य घटक आहे. जगभरात मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या दहा मुख्य आजारांपैकी आठ आजारांमागे तंबाखूचे सेवन हे एक मुख्य कारण असू शकते, असे सर्वेक्षणामधून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शेडगे यांनी पूर्ण केलेला हा अभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button