breaking-newsमुंबई

मिनी ट्रेनच्या वातानुकूलित डब्यामुळे ३० हजारांची कमाई

मुंबई – माथेरानच्या मिनी ट्रेनला एक वातानुकूलित डबा जोडण्यात आला असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत या ट्रेनद्वारे मध्य रेल्वेने ३० हजार रुपयांची कमाई केली आहे.

नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर धावणाऱ्या मिनी ट्रेनला ८ डिसेंबरपासून एक वातानुकूलित डबा जोडण्यात आला आहे. १६ प्रवासी क्षमता असलेल्या या डब्यातून प्रवासासाठी प्रत्येकी ४१५ रुपये शुल्क आकारले जाते. हा डबा सेवेत येताच त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. या ट्रेनच्या दोन्ही फेऱ्या रविवारी हाऊसफुल होत्या. वातानुकूलित डब्यात शनिवारीही नेरळ येथून जाताना १६ आणि येताना सहा प्रवासी होते. सोमवारीही माथेरानमध्ये जाताना वातानुकूलित डब्यातील सर्व आसने भरलेली होती. येताना मात्र एकच प्रवासी होता. गेल्या तीन दिवसांत यातून ३० हजार रुपये उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले आहे. परंतु शुल्क कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button