breaking-newsमनोरंजनमुंबई

मिथुन चक्रवर्तींच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय उर्फ मिमोह आणि पत्नी योगिता बाली यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामिन अर्ज  उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

मायलेकाविरोधात बलात्कार, फसवणूक आणि गर्भपात करण्याची सक्ती केल्याचा आरोप एका महिलेकडून करण्यात आला आहे.  या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. याच संदर्भात अटकपूर्व जामिन अर्ज करण्यात आला होता. या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर झाली. तसेच दिल्लीतील  न्यायालयाचे आदेश असल्याने ही याचिका इथे उभी रहात नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

हिंदी आणि भोजपुरी चित्रपटातील अभिनेत्रीने योगिता आणि महाअक्षय विरोधात तक्रार केली होती. लग्नाच्या आमिषाने महाअक्षयने शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा या तक्रारीत केला आहे. महाअक्षय उर्फ मिमोहने 2008 साली ‘जिमी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर हाँटेड, लूट यासारख्या काही चित्रपटांमध्ये तो झळकला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button