breaking-newsUncategorizedपुणे
मित्रांनी किरकोळ वादातून मित्रांची केली हत्या
पुणे – कोथरूडच्या चांदणी चौकात कला ग्राम परिसरात पार्टीसाठी गेल्यानंतर किरकोळ वादातून मित्राचा चौघांनी बेदम मारहाण करत डोक्यात बाटली घालून हत्या केली.
अक्षय झोरी ( वय २१) असे खून झालेल्याचे नाव असून कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
झोरी आणि त्याचे इतर चार मित्र रात्री पार्टीसाठी बाहेर गेले होते. दरम्यान रात्री साडे तीन वाजता ते चांदणी चौकातील जैन लोहिया आयटी पार्कजवळ अक्षय व मित्रांचा किरकोळ वाद झाला. यातच चौघांनी अक्षयला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात बाटली घातली. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे तर एक जण पसार झाला आहे.