breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मासळीच्या भावात वाढ : चिकन, मटण आणि अंडी स्थिर

पुणे- सध्या फक्त पूर्व र्किनारपट्टीवरून बाजारात मासळीची आवक सुरु आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळचा फटका या किनारपट्टीला बसल्याने मासेमारी घटली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी होत आहे. परिणामी, सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात सुमारे 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.
शनिवारी (दि. 7 जुलै) पालखी शहरात दाखल झाल्याने गणेश पेठेतील मुख्य बाजार रविवारी सुद्धा बंद ठेवण्यात आला आहे. मागणी आणि पुरवठ्यातील समतोलामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत मटण, चिकन आणि अंडी स्थिर आहेत. रविवारी गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुद्रातील 7 ते 8 टन, खाडीच्या मासळीची 150 ते 200 किलो, नदीच्या मासळीची 500 ते 600 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 8 ते 10 टन आवक झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : 1500, मोठे : 1300 , मध्यम : 900-1000 लहान :800-900, भिला : 600, हलवा : 700, सुरमई : 600-700, मोठे 900-1000 रावस-लहान : 550-650, मोठे 800 घोळ : 650, करली : 400, भिंग : 400, पाला : 1100-1200, वाम : पिवळी लहान 320 -320 मोठे 480, काळी : 240, ओले बोंबील : 360, कोळंबी ः लहान : 280, मोठी : 480 जंबोप्रॉन्स : 1500,किंगप्रॉन्स : 900, लॉबस्टर : 1500, मोरी : लहान 200, मोठे 400, मांदेली : 160 राणीमासा : 200, खेकडे : 280, चिंबोऱ्या : 480, खाडीची मासळी : सौंदाळे : 400, खापी : 280, नगली : लहान 400 मोठी 700, तांबोशी : 480, पालू : 320, लेपा : 200-280, शेवटे : 280 बांगडा : श्र 200- ा320 ,पेडवी : 60, बेळुंजी : 140, तिसऱ्या : 180-200 खुबे : 160. तारली : 120-140 नदीची मासळी : रहू : 140, कतला : 150, मरळ : लहान 360 मोठी 480, शिवडा : 200 चिलापी :60, मागुर : 100, खवली :160, आम्ळी : 60 खेकडे : 160, वाम : 400-480. मटण : बोकडाचे : 460, बोल्हाईचे : 460, खिमा : 460, कलेजी : 480. चिकन : चिकन : 140, लेगपीस : 170, जिवंत कोंबडी : 110, बोनलेस : 240. अंडी : गावरान : शेकडा : 680, डझन : 90 प्रति नग : 7.5. इंग्लिश : शेकडा : 450 डझन : 60 प्रतिनग : 5.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button