breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा नवा डावपेच

मावळ लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसची आता जय्यत तयारी 

पिंपरी – राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. मावळ लोकसभेसाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नावाचा विचार राष्ट्रवादीने सुरु केला आहे.

संजोग वाघेरे-पाटील हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आहेत. सध्या ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आहेत. वडिलांकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील भिकू वाघेरे हेही महापौर होते. संजोग हे त्यांचाच वारसा पुढे चालवित आहेत. अत्यंत सौम्य व मितभाषी असलेले संजोग वाघेरे यांची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे.

आघाडी झाली तर मावळ मतदार संघाची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. याआधी दोन वेळा अत्यंत दुय्यम उमेदवार देऊन राष्ट्रवादीने येथे पराभव चाखला आहे. या मतदारसंघात ताकद असतानाही राष्ट्रवादीचे धोरण चुकत असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. आता पराभवाची ही मालिका खंडित करून हा मतदार संघ काबीज करण्याची राष्ट्रवादीने जय्यत तयारी केली आहे. त्याअनुषंगाने शहरात जागोजागी होर्डिंग लावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मुखपत्रातही त्यांची जाहिरात होती. ही सर्व तयारी आगामी लोकसभेसाठी असल्याचे दिसून येते. संजोग वाघेरे यांच्या वाढदिवसाला मात्तबर नेत्यांची उपस्थिती आणि त्यांना असलेले अजित पवार यांचे पाठबळ पहाता मावळ लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर करण्याची फक्त आता औपचारिकताच बाकी आहे.

दरम्यान, भाजपाकडून मावळ मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांचा विचार भाजपाच्या कोअर कमिटीमध्ये सुरु आहे. सेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर करणार असल्याने त्यांनी सुद्धा कंबर कसली आहे. त्यामुळे येत्या काळात मावळ मध्ये तिरंगी सामना होणार, हे मात्र खरे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button