breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळ मतदार संघाचे उमेदवार पार्थ पवार यांनी केले होळीचे पूजन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकळातील भस्मासुरांनी उद्योगनगरीला लावलेली दृष्ट उतरवून टाकण्यासाठी मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी पिंपरीत होळीचे पूजन केले. त्यांच्यासोबत युवा नेते रोहीत पवार देखील उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक राजू मिसाळ, शाम लांडे, प्रवक्ते फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीची सत्ता असताना अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडचा कायापालट केला. परिणामी, नोकरी, व्यवसाय, आयटी बिजनेस करणा-यांना उद्योगनगरीची भुरळ पडली. शहरात अनेक व्यवसाय सुरू झाल्यामुळे अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, नाल्यांची व्यवस्था, अंडरग्राऊंड विद्युत पुरवठा, व्यायामशाळा, सायन्स पार्क, बर्ड व्हॅली सारखी उद्याने बनविली. रस्त्यांचे जाळे आणि महाकाय उड्डाणपुल तयार करून त्यावर बीआरटीचे जाळे उभे केले. मात्र, 2017 मधील सत्तांतरानंतर उद्योगनरीला भस्मासुरांची दृष्ट लागली. ती उतरवून टाकण्यासाठी मावळचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांनी होळीचे पूजन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button