breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मावळात मतदार जनजागृतीसाठी उद्या सायकल रॅली

चिंचवड –  मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघात उद्या (रविवारी) सकाळी साडेसहा वाजता सायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत सायकलस्वार, सायकलप्रेमी संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत यांनी केले आहे.

लोकसभा, विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होती. मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी, लोकशाही समृद्ध व बळकट करण्याकरिता निवडणूक आयोगातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. पथनाट्याद्वारे जनजागृती केली जात आहे. त्याअंतर्गत उद्या (रविवारी)पिंपरी विधानसभा मतदारसंघात सायकल रॅली काढण्यात येणार आहे.

दरम्यान, सकाळी साडेसहा वाजता आकुर्डीतील डॉ. हेडगेवार भवनापासून रॅलीला सुरुवात होणार आहे. संभाजी चौक, भक्ती-शक्ती, पिंपरी महापालिका भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शगुन चौक, साई चौक, गणेश हॉटेल तपोवन मंदिर, डीलक्स चौक, रीव्हर रोड, भाटनगर, लिंकरोड, चापेकर चौक, वाल्हेकरवाडी स्पाईन रोड, संभाजी चौक मार्गे डॉ. हेडगेवार भवन येथे रॅलीची सांगता होणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button