breaking-newsताज्या घडामोडीपुणे

माढ्यात संजय शिंदेचा पराभव चाहत्याच्या जिव्हारी, औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर – लोकसभेच्या निवडणुकीत आवडीचा उमेदवार पडल्याने एका तरुणाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा माहिती समोर आली आहे. पांडुरंग शिंदे (वय-24) असं या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. माढा तालुक्यातील शिंदेवाडी येथील तो रहिवासी असून त्याच्यावर बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय शिंदे यांचा पराभव झाला म्हणून पांडुरंग शिंदे याने गोचीड मारण्याचं  औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. पांडुरंग शिंदे हा तरुणाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, तो आई, वडील, पत्नी व मुलासोबत माढा तालुक्यातील शिंदेवाडी येथे राहतो. तो म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन सुतगिरणीत एआर विभागात क्लार्क म्हणून नोकरी करतो.

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय शिंदे पराभव झाला. या टेन्शनमध्ये आपण मेडिकल स्टोअर्समधून गोचीड मारण्याचं औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तो जागेवरच बेशुद्ध होऊन पडला. पांडुरंग याचा चुलतभाऊ गजेंद्र शंकर शिंदे याने त्याला तातडीने बार्शी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. त्यामुळे सुदैवाने पांडुरंग थोडक्यात बचावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button