breaking-newsमनोरंजन

माझ्या बायोपिकमध्ये ‘या’ अभिनेत्रीने साकारावी भूमिका- शर्मिला टागोर

मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी मीडियाशी संवाद साधला. या संवादादरम्यान स्वत:चे आत्मचरित्र लिहिण्यास सुरूवात केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘जर कोणा निर्मात्याला त्यावर भविष्यात चित्रपट तयार करायचा असेल तर माझी हरकत नाही’ असंही त्या म्हणाल्या.

शर्मिला यांना बायोपिकमधील त्यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्री सारा आली खानचे नाव सुचवण्यात आले होते. त्यावर ‘बायोपिकमध्ये माझी भूमिका साराने पार पाडली तर मला जरूर आवडेल’ असेही त्या म्हणाल्या.

कु़टुंबातील मुलांचे काम पाहून आनंद होत असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘माझी नातवंड मेहनत घेऊन बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण करत आहेत. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे’ असं त्यांनी सांगितलं. शर्मिला सारा अली खानच्या अभिनयावर खूपच खूष आहेत. तसेच अभिनयापेक्षा साराच्या मुलाखती मला फार आवडतात असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button