breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीकडून विविध उपक्रम

पिंपरी, (महाईन्यूज) – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिपंरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय राष्ट्रवादीने भरगज्ज सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील शाळेत तसेच महाविद्यालयात शिकणा-या इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सोहळा घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादीकडून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाणार आहे. यामध्ये 80 टक्के व त्यापुढील गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी गुणपत्रकाची प्रत गुरूवार (दि. 25) पर्यंत राष्ट्रवादीच्या खराळवाडी, पिंपरी कार्यालयात जमा करावी. हे कार्यालय सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहापर्यंत सुरू असते, अशी माहिती युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिली आहे.

शहर संघटनेच्या वतीने 22 जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय, त्यादिवशी वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छता मोहिम, एक कुटुंब एक रोप, स्वसंरक्षण करण्याचे युवतींना प्रशिक्षण, महिलांसाठी होम मिनिस्टर, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button