breaking-newsपिंपरी / चिंचवड

महिलेला हाॅटेलमध्ये भेटायला बोलावून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

वाकड –  हिंजवडी येथील “एका” या पंचतारांकीत हॉटेलात कामा निमित्त भेटायला बोलावून एका इसमाने २९ वर्षीय महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि.१९ जानेवारी) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पिडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.९) तक्रार दाखल केली. त्यानुसार, अंकीत आगरवाल (रा. आगरवाल ब्रदर्स १६८, गणपत मार्ग सतना मध्यप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.१९ जानेवारी) सकाळी अकराच्या सुमारास आरोपी अंकीत याने पिडित २९ वर्षीय महिलेला कामानिमित्त भेटण्यासाठी हिंजवडी येथील “हयात” या पंचतारांकीत हॉटेलात बोलवले होते. या ठिकाणी भेटून बोलणे झाल्यानंतर महिला घरी निघाल्या असता आरोपी अंकीत याने महिलेला मिठीत घेऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने शनिवारी (दि.९) हिंजवडी पोलीस ठाण्यात अंकीत विरोधात तक्रार दाखल केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button