breaking-newsपुणे

महिलेची छेड काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराची जमावाकडून हत्या

पुणे ( महा ई न्यूज ) – महिलेची छेडछाड केल्याची पोलिसांकडे तक्रार दिल्याचे समजल्यानंतर त्यांच्या घरावर दगडफेक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जमावातील ३ ते ४ जणांनी मारहाण करून त्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार वानवडीत शनिवारी रात्री घडला. अक्षय सोनावणे (वय २८, रा़ दरोडे वस्ती, वानवडी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, अक्षय सोनवणे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी, मारामाऱ्याचे गुन्हे दाखल आहेत. शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तो महंमदवाडी येथील राजीव गांधी कॉलनीमध्ये गेला होता. दारुच्या नशेत त्याने तेथील एका महिलेशी वादावादी केली. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे या प्रकाराची तक्रार दिली. ही गोष्ट अक्षय या समजल्यानंतर तो रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा राजीव गांधी कॉलनीत गेला. त्याने या महिलेच्या घरावर दगडफेक केली. तेथे पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. यावेळी चिडलेल्या जमावाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो त्यांनाही शिवीगाळ करुन लागल्याने त्यातील ३ ते ४ जणांनी त्याला मारहाण केली. त्यात तो जबर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अक्षय सोनावणे याला तातडीने ससून रुग्णालयात नेले़ परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button