breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मराठा आंदोलन, पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात कडकडीत बंद ; जनजीवन विस्कळीत

पुणे –   मराठा आरक्षणासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड शहर, जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. काही किरकोळ तोडफोडीच्या घटना वगळता बंद शांततेत पार पडला.

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज सकाळपासुन शहरासह उपनगरात कडकडीत बंद होता. मोठ्या प्रमाणावर जागोजागी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी दहा वाजता एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर ‘ जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा, लाख मराठा’ जय जिजाऊ, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत केंद्र व राज्यसरकारविरोधात तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या 

– मराठा समाजाला घटनात्मक वैध आरक्षण द्या
– राजर्षी छत्रपती शाहु महाराज फी प्रतिपुर्ती योजना काटेकोर अंमलबजावणी
– डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता द्या
– प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवन वसतीगृहासाठी शासकीय जमिन द्या
– मराठा कुणबी ओबीसी जात प्रमाणपत्र योजना राबवा
– छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण मानव विकास संस्था अर्थात सारथी कार्यान्वित करा
– आंदोलकावरी गुन्हे मागे घ्यावेत
–  अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर थांबवावा
– स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागु करा
– मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण रोखा
– मराठा समाजाला पदोन्नतीतील अन्याय दुर करा

पोलिसांवरचा ताण वाढला
शहराच्या मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमधील रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकसेवा, पेट्रोलपंप, भाजी मंडई, बसस्थानके, दुकाने, शॉपिंग मॉल, बाजारपेठा पुर्णत: बंद होत्या. काही ठिकाणी दगडफेक, तोडफोड, दुकाने व भाजी मंडई बंद ठेवण्यावरुन झालेला वाद वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व मुख्य रस्ते, चौकांमध्ये प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे पोलिस प्रशासनावरील ताण वाढला होता.

बंदची क्षणचित्रे…..
– प्रमुख चौकांसह रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त
– भगवे झेंडे, उपरणे, फेटे घालुन दुचाकीवरुन रॅली
– पेट्रोलपंप, सिनेमागृहे, शॉपिंग माॅल, शाळा, महाविद्यालये, बँका पुर्णत: बंद
– एसटी व पीएमपी बसस्थानकांमध्ये शांतता
– पुरुष, महिलांसह युवक, युवतींचा उत्स्फुर्त सहभाग
– शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरातील रस्त्यांवर शुकशुकाट
– दुकाने बंद करण्यावरुन आंदोलनकर्त्यांमध्ये वाद
– काही ठिकाणी दगडफेक, तोडफोडीच्या घटना
– जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला छावणीचे स्वरुप

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button