breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापौर पदी माळी समाजाला संधी द्यावी, समाजाची मागणी

पिंपरी – महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी राहूल जाधव इच्छुक असताना माळी समाजावर भाजप नेत्यांनी अन्याय केला. आता ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेले महापौर पद देऊन माळी समाजाला न्याया द्यावा, अशी मागणी अखिल माळी समाजाच्या वतीने शनिवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत केली आहे.

 

माळी समाजाच्या वतीने नगरसेविका आश्विनी जाधव, स्वीनल म्हेत्रे, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अजय सायकर, सुनिल लोंढे, मारुती जांभूळकर यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले की, शहरातील विधानसभा व महापालिका निवडणुकांमध्ये माळी समाजाने भाजपला, तसेच आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांना पाठिंबा दिला. राष्ट्रवादीने यापूर्वी माळी समाजाच्या अनिता फरांदे, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर यांना महापौरपदी संधी दिली. मात्र, भाजपकडून स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या निवडीत माळी समाजाच्या राहूल जाधव यांना डावलण्यात आले होते.

त्यानंतर आता महापौरपद ओबीसींसाठी राखीव आहे. यापूर्वी कुणबी असलेले नितीन काळजे पदावर होते. परंतु, यावेळी महापौर निवड करताना इतरांऐवजी माळी समाजाच्या नगरसेवकाला संधी देऊन न्याय मिळावा. या मागणीवर शहरातील सर्व माळी समाजाचे पदाधिकारी व समाज ठाम आहेत. आमचे प्रश्न सोडविण्यासाठी ही संधी मिळावी, अन्यथा भाजपला आगामी निवडणुकांमध्ये परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button