breaking-newsक्रिडा

महापौर चषक क्रिकेट स्पर्धा : पूना क्‍लबचा एकतर्फी विजय

पुणे – यश नाहारच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या बळावर पूना क्‍लबने सनी इलेव्हन संघाचा 10 गडी राखून पराभव करत येथे सुरु असलेल्या महापौर चषक क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. तर अन्य सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने रांजणे क्रिकेट ऍकॅडमी संघाचा पराभव केला.

महापौर स्पर्धेत पूना क्‍लब विरुद्ध सनी इलेव्हन संघातील सामन्यात सनी इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 131 धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्यासाठी अद्वेतने 42 धावांची झुंझार खेळी केली. तर त्याला हर्ष सांगवीने 30 धावा करत उत्तम साथ दिली. 131 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या पूना क्‍लब संघाच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. यश नाहारने शानदार शतक झळकावत संघाला 11 व्या षटकातच विजय मिळवून दिला तर त्याला अजिंक्‍य नायरने चांगली साथ दिली. पूना क्‍लबचा एकही गडी बाद न करता आल्याने दहा गडी राखून सामना गमावण्याची नामुष्की सनी इलेव्हन संघावर ओढवली. यश नाहारला सामानावीराच्या किताबाने गौरवण्यात आले.

तर दुसरा सामना रांजणे क्रिकेट ऍकॅडमी आणि डेक्कन जिमखाना संघ यांच्यात रंगला. प्रथम फलंदाजी करताना रांजणे संघ सर्वबाद 46 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्यासाठी ऋषभ चव्हाणने सर्वाधिक नाबाद 12 धावा केल्या होत्या. डेक्कनसाठी पियुष साळवीने 5 धावात 3 बळी मिळवले. प्रत्युत्तरात फलंदाजीस आलेल्या डेक्कन संघाने शुभम नागवडेच्या 31 धावांच्या जोरावर हा सामना 7 षटकात जिंकला. शुभमला सामनावीराचा पुरास्कार देण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button