breaking-newsताज्या घडामोडीपुणे

महापालिकेत शिक्षक भरती घोटाळा ?

प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी चुडीचुप्प भूमिका

पिंपरी- महापालिका शिक्षण विभागात 16 शिक्षकांना  वर्ग करण्यात आले असून याकरिता लाखो रुपये घेतल्याची चर्चा पालिकेत रंगली आहे. याविषयी प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी चुडीचुप्प भूमिका घेतली असून आयुक्तांच्या परवानगीनेच हे शिक्षक वर्ग केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

‘सीईटी’ परिक्षेत 2010 मध्ये पात्र झालेले प्राथमिक विभागातील 18 शिक्षक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे वर्ग करण्याचा उच्च न्यायालयाच्या आदेश होता. त्यानुसार शिक्षण संचालकांच्या प्राथमिक विभागाने तसे 18 शिक्षक महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे वर्ग केले होते. त्यानुसार तत्कालीन आयुक्तांच्या नावे नोव्हेंबर 2016 मध्ये पत्रही आले होते. तत्कालीन शिक्षण मंडळ सदस्यानी त्या शिक्षकांना हजर करुन घेण्याबाबतचा ठरावही मंजूर केला होता.

शिक्षकांचे ‘रोस्टर’ तपासले नाही, असे कारण देत प्रशासनाने हे शिक्षक हजर करुन घेण्यास दिरंगाई केली; परंतु खरे कारण हे तत्कालीन शिक्षण विभाग यांच्याकडे होता ते वरिष्ठ अधिकारी व काही पदाधिकार्‍यांची ‘अर्थ’ विषयक बोलणी फिस्कटल्याने त्या शिक्षकांना हजर करुन घेण्यास विलंब केला जात होता. त्यामुळे ते शिक्षक पुन्हा न्यायालयात गेले. त्यानंतर महापालिकेत सत्तांतर होवून भाजपची सत्ता आली. शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांना हाताला धरत एका भाजपच्या नेत्याने फेब्रुवारीमध्ये 18 पैकी 16 शिक्षक हजर करुन घेतले. त्यामुळे त्या शिक्षकांना हजर करुन घेताना प्रत्येकी पाच लाख रुपये घेतल्याची महापालिकेत चर्चा रंगली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button