breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेत प्रलंबित रेकॅार्डची 1 जूनपासून विशेष तपासणी मोहीम

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील प्रलंबित आक्षेपाधिन रकमा, वसुलपात्र रकमा व रेकॅार्ड तपासणीसाठी मुख्य लेखापरिक्षण विभागाने 1 जूनपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती मुख्य लेखापरिक्षक पद्मश्री तळदेकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागाचे प्रलंबित आक्षेपाधिन रकमा, वसुलपात्र रकमा व रेकॅार्ड तपासणीकामी उपलब्ध झालेले नाही. त्या आक्षेपाधिन रक्कमांचे अनुषंगाने विविध विभागातील उपलब्ध रेकॅार्डची तपासणी होणार आहे. त्या विभागात प्रत्यक्ष जावून मुख्य लेखापरिक्षण विभागाचे लेखापरिक्षक तपासणीचे कामकाज करणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या प्रत्येक विभागातील विभाग प्रमुख अधिका-यांनी आक्षेपाधिन रकमांचे रेकॅार्ड तपासणीसाठी विभागात डी.आे.सी. नुसार तयार ठेवावे, उपलब्ध रेकॅार्ड प्रत्यक्ष तपासणीचे कामकाज पुर्ण करुन आक्षेपित बाबींचे तपशिल अहवालाद्वारे आक्षेप विभागांना कळविण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष तपासणीकामी उपलब्ध झालेले रेकॅार्ड मुळ आक्षेपाधिन रकमेमधून कमी करता येईल, असेही तळदेकर यांनी लेखी आदेशात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button