breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेतर्फे सामुदायिक, सार्वजनिक शौचालयांसमोर रांगोळीने सुशोभिकरण

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – जागतिक शौचालय दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील “सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता” ही विशेष मोहिम आज सोमवारी (दि. 19) राबविण्यात आली. झोपडपट्टी परिसरातील तसेच इतर सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करुन याप्रसंगी परिसरात रांगोळी काढून सुशोभिकरण करण्यात आले. तसेच, शौचालयांचा व्यवस्थित वापर करणा-या नागरिकांचे अभिनंदन करण्यात आले.

जागतिक शौचालय दिनानिमित्त अ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्र १४ चिंचवड स्टेशन येथील शौचालय, खडी मशीन जय मल्हार नगर झोपडपटटी काळभोरनगर, मोरवाडी घरोंदा हॉटेलच्या समोरील शौचालयाची स्वच्छता स्वच्छता करून समोर रांगोळी काढण्यात आली. ब क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रभाग क्र २२ स्मशानभूमी शेजारी, प्र. क्र. १६ डी-मार्टमागील जाधववस्ती, प्र.क्र. १७, वाल्हेकरवाडी व प्रभाग क्र. १८ मधील गावडे जलतरण तलावाशेजारील पांढरीचा मळा येथील सार्वजनिक शौचालये यांची साफसफाई करण्यात आली. क क्षेत्रीय कार्यालयामध्ये नेहरुनगर, वरदहस्त सोसायटी खराळवाडी, जाधववाडी गवळीमाथा तसेच ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पिंपळे सौदागर स्मशानभूमी जवळ, दत्तमंदीराजवळ, पिंपळे गुरव येथील इंगवले आळी, वाकड गावठाण परिसरातील सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करुन सेल्फी काढण्यात आले. तसेच रांगोळी काढुन परीसर सुशोभित करण्यात आला.

इ क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रभाग क्रमांक ७ शांतीनगर, प्रभाग क्रमांक ४ बोपखेल गावठाण, प्रभाग क्रमांक ५ सखुबाई गवळी उदयान, प्रभाग क्रमांक ३ मधील नाशिक रोड मोशी चौक येथे तर फ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक १ मधील चिखली घाट, प्रभाग क्रमांक ११ दुर्गानगर, कॉटनकिंग जवळ साने चौक, प्रभाग क्रमांक १२ चव्हाण वस्ती तळवडे , प्र.क्र. १३ महाराणा प्रताप चौक, तसेच स्मशानभूमी निगडी येथील सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करण्यात आली. ग क्षेत्रीय कार्यालयातील पिंपरी शास्त्रीनगर, संजयगांधीनगर झोपडपटटी परिसरातील व ह क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रं ३० संजयनगर फुगेवाडी, लांडेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी येथील झोपडपटटी परिसरातील सामुदायिक शौचालये, लांडेवाडी शिवाजी पुतळयामागील सार्वजनिक शौचालय साफसफाई करुन जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आला.

शौचालय साफसफाई तसेच देखभाल याबाबत काही तक्रार असल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाशी अथवा सारथी हेल्पलाईन क्र. ८८८८००६६६६, अथवा ७७४५०६५९९९ या व्हॉटसअप क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन स्वच्छ भारत अभियानचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button