breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेतर्फे चिंचवड विधानसभेतील दिव्यांग मतदारांचा सन्मान

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मतदारांचा शोध घेऊन चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील दिव्यांग व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

निवडणूक आयोगातर्फे छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सोमवारी (दि. 3) जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी दिव्यांग मतदारांचा शोध घेऊन अशा मतदारांचा सत्कार करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिले होते. त्यानुसार चिंचवड विधानसभा मतदार संघांतर्गत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यक्रम घेण्यात आला. सुरूवातीला दिव्यांग मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या हस्ते दिव्यांग मतदारांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात मतदार नोंदणी अधिकारी दिलीप गावडे यांनी दिव्यांग मतदारांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, असे आवाहन केले. लोकशाहीला बळकट करण्यासाठी दिव्यांगांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविणे अपेक्षीत आहे, असे मतदार नोंदणी अधिकारी राधीका हावळ आणि नायब तहसिलदार उषा ठोंबरे यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button