breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेतर्फे उद्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी- चिंचवड महापलिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत इयत्ता १० वी मधील गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव व बक्षिस वितरण समारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सोमवारी (दि. ४) सकाळी दहा वाजता चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. तरी, विदयार्थ्यांनी व पालकांनी कार्यक्रमास उपस्थित राहवे, असे आवाहन महापौर राहूल जाधव यांनी केले.

पिंपरी-चिंचवडमधील ८० टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त करणा-या इयत्ता १० वीच्या विदयार्थ्यांना प्रोत्साहनपर रक्कम बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. तसेच, प्रा. अरविंद नातू व प्रा. आनंद देसाई हे स्पर्धा परीक्षेची तयारी व करीयर मार्गदर्शन करणार आहेत. तरी, शहरातील विदयार्थ्यांनी या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन महापौर जाधव यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button