breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या सर्व मिळकतींवर सीसीटीव्ही बसवा – महापाैर राहूल जाधव यांच्या सुचना

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व मिळकतींवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सुचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.
महापालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, बॅडमिंटन हॉल, जलतरण तलाव, भाजी मंडई, भोसरी कुस्ती केंद्राना भेटी दिल्या, याप्रसंगी त्यांनी वरील सुचना केल्या.

यावेळी महापौर यांच्या सोबत शिक्षण समितीच्या सभापती प्रा.सोनाली गव्हाणे, नगरसदस्य प्रियांका बारसे, अनुराधा गोफणे, निर्मला गायकवाड, सागर गवळी, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, इ क्षेत्रीय अधिकारी श्री. श्रीनिवास दांगट , कार्यकारी अभियंता श्री. संजय घुबे, प्रविण घोडे, उपअभियंता श्री.वहीकर, श्री.लांडे, श्री.गवळी प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, सहाय्यक आरोग्याधिकारी श्री. प्रभाकर तावरे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, उद्यान अधिक्षक डी.एन.गायकवाड, श्री.बगाडे इ. उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या भोसरी सहल केंद्र, नव्याने विकसित होत असलेले भोसरी कुस्ती प्रशिक्षण केंद्र, भोसरी भाजी मंडई, महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन व्यायमशाळा, सखुबाई गवळी उद्यान, कारंजे, व्यायामशाळा, ध्यानमंदीर, प्रभाग क्र. ५ मधील बॅडमिंटन हॉल, गंगोत्री पार्क उद्यान, दिघी क्रीडा मैदान, दिघी येथील नव्याने विकसित होत असलेली पाण्याची टाकी, संत समुह शिल्प प्रकल्प च-होली, इ. ठिकाणी भेटी दिल्या. स्वच्छता मोहिमे अंतर्गत वॉर्डात स्वच्छता राखणे, दररोज साफसफाई करणे, राडारोडा उचलणे, उद्यानातील कारंजे दुरूस्त करणे, ट्री गार्ड काढणे, क्रीडांगणे विकसित करणे, इ. सुचना महापौर राहुल जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच दिनांक १५/०१/२०१९ रोजी फ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकतींची पाहणी करणार असलेचे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button