breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या रुग्णालयात आरोग्य वर्धिनी केंद्र सुरु होणार

  • आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करणार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आरोग्य विषयक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरिता महापालिकेच्या 11 दवाखाने व रुग्णालयात आरोग्य वर्धिनी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. त्या केंद्रामार्फत विविध आजारांवर सल्ला, औषधोपचार मिळणार आहे.

राज्य शासनाच्या सुचनेनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने 11 दवाखाने व रुग्णालयात आरोग्य वर्धिंनी केंद्र सुरु केले आहे. आरोग्य वर्धिनी केंद्रात रुग्णांसह नागरिकांना सर्व आरोग्य विषयक आवश्यक पायाभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये नागरिकांना असंसर्गजन्य रोग, रक्तदाब, मुधमेह यासह विविध आजारांबाबत मार्गदर्शन आणि औषधोपचार करण्यात येत आहे.

महापालिकेच्या दवाखाने, रुग्णालयात आरोग्य वर्धिनी केंद्रातून रुग्णांनी, ज्येष्ठ नागरिकांनी विविध आरोग्य विषयक सुविधाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पवन साळवे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button