breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या जून्या वाहनांचा लिलाव ; स्थायीसमोर प्रस्ताव

पिंपरी – महापालिकेच्या वापरात असलेली मात्र, मुदत संपलेल्या 69 जुन्या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. याकरिता आतापर्यंत तीन वेळा निविदा मागविण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत एकाच लिलावदाराने निविदा सादर केल्याने त्याच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

महापालिका मालकीच्या एकूण 69 निकामी, जुन्या झालेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी लिलावदारांची कमिशनवर नेमणूक करण्यात येणार आहे. या नेमणुकीसाठी तीन वेळा ऑनलाईन पद्धतीने दर मागविण्यात आले होते. मात्र, तीन वेळा निविदा मागवूनही एकाच लिलावदाराची निविदा प्राप्त झाली. त्यामुळे महापालिका आयुक्तांनवी एकच निविदा उघडण्यास मान्यता दिली. त्यामध्ये रिलायन्स ऑक्‍शनर्स यांची निविदा प्राप्त झाली आहे. ही रक्कम आरटीओने विहित केलेल्या वाहनांच्या लिलावाच्या गोपनीय किंमतीच्या दोन टक्के अधिक रकमेची निविदा प्राप्त झाली आहे. हा दर स्वीकार करुन वर्षभराकरिता करार करणे व लिलावाद्वारे मिळणारे कमिशन देण्याचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button