Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महानगरपालिकेच्या मुख्य लेखापरिक्षक पद्यश्री तळदेकर यांची बदली

पिंपरी –  महानगरपालिकेच्या मुख्य लेखापरिक्षक पद्यश्री तळदेकर यांची पुणे येथील मध्यवर्ती इमारतीत शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालक तथा वित्त व लेखा अधिकारी पदावर बदली करण्यात आली, राज्य शासनाने आज (गुरुवारी) त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मुख्य लेखापरिक्षक म्हणून पद्यश्री तळदेकर या गेल्या साडेतीन वर्षापासून कामकाज करीत आहेत. महानगरपालिकेतील मुख्य लेखापरिक्षक विभागातील सहकारी कर्मचा-याकडून त्यांनी प्रलंबित लेखापरिक्षणाचे काम पुर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला आहे.  महापालिकेचे तब्बल 1983 पासूनचे प्रलंबित आक्षेप, आक्षेपाधिन रकमा, वसुलपात्र रकमा व रेकॅार्ड उपलब्ध न झालेल्या प्रलंबित रकमा याबाबतचे कामकाज पुर्ण करण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या सर्वच विभागाचे लेखा परिक्षण करण्यासाठी त्यांनी दोन ते तीन वर्षांचे टप्पे करीत लेखापरिक्षण केले आहे.  तसेच रेकॅार्ड गहाळ करणा-या अधिका-यांना नोटीस काढणे, त्यांच्याकडून लेखापरिक्षणास रेकॅार्ड उपलब्ध करीत लेखापरिक्षण पूर्ण केले आहे.

दरम्यान, पद्यश्री तळदेकर यांची 19 वर्षे शासकीय सेवा पुर्ण झाली आहे. त्यांनी यापुर्वी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाऊर्जा विभाग, उपमुख्य लेखा परिक्षक मुंबई,  पुण्यातील शासकीय दुध डेअरी, कृषी आयुक्तालय आदी विभागात लेखा परिक्षक म्हणून यशस्वी काम केले आहे.  पिंपरी-चिंचवड महापालिकेत त्यांची मुख्य लेखापरिक्षक पदावर साडेतीन वर्षे सेवा झाल्याने त्यांची बदली झाली आहे. आता त्या पुण्यामध्ये माध्यमिक शिक्षण विभागातील उपसंचालक तथा वित्त व लेखा अधिकारी पदावर बदली करण्यात आली. उद्या बदलीचा आदेश मिळाल्यानंतर त्या महापालिकेतील पदभार सोडणार आहेत.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button