breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

महानगरपालिका शिवसेना गटनेता राहूल कलाटेंवर गुन्हा दाखल

  • उपअभियंत्यास मारहाण केल्याने सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

पिंपरी (महा ई न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील उपअभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.  ही घटना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवनात (सोमवारी दि.11) घडली.

राहुल कलाटे (वय ३५, रा. वाकड) आणि विनोद मोरे (वय २८, रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अनिल महादेव राऊत (वय ५२, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, चिंचवड) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास विनोद मोरे यांनी फिर्यादी अनिल राऊत यांना फोन केला. नगरसेवक राहुल कलाटे यांच्या टीडीआर फाईलवर सही का केली नाही म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर कलाटे यांनी फोनवरून राऊत यांना शिवीगाळ केली. त्यानंतर महापालिका भवनातील कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्या कार्यालयात राऊत यांच्यावर कलाटे यांनी खुर्ची फेकून मारली. कलाटे हे अंगावर धावून आले. आणि गचंडी पकडली.  त्यामुळे आरोपींनी सरकारी कामात अडथळा आणला, फिर्यादीस अर्वाच्छ भाषेत शिवीगाळ करुन दमदाटी केली म्हणून त्यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे.

याबाबत राहुल कलाटे म्हणाले, ” आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्यासाठी भाजपच्या काही लोकांंनी रचलेले हे षडयंत्र आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button