breaking-newsआंतरराष्टीय

मसूद अझहरसंदर्भातील चीनची भूमिका निराशाजनक: भारत

‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावात चीनने खोडा घातल्यानंतर भारताने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मसूद अझहरसंदर्भातील चीनची भूमिका निराशाजनक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच या प्रस्तावात भारताची साथ देणाऱ्या देशांचेही परराष्ट्र मंत्रालयाने आभार मानले आहेत.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला. बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीपुढे चीनने पुन्हा एकदा नकाराधिकारचा वापर केला आणि मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा भारताचा प्रयत्न चौथ्यांदा अपयशी ठरला.

संयुक्त राष्ट्रातील या घडामोडींवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवता न आल्याने आम्ही निराश झालो आहोत. यामुळे पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यासाठी कारणीभूत असलेल्या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाला कारवाई करता आली नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

ANI

@ANI

Ministry of External Affairs: We are grateful for the efforts of the Member States who moved the designation proposal and the unprecedented number of all other Security Council members as well as non-members who joined as co-sponsors.

ANI

@ANI

@ANI यांना प्रत्युत्तर देत आहे

MEA: We are disappointed by this outcome. This has prevented action by the international community to designate the leader of (JeM), a proscribed and active terrorist organization which has claimed responsibility for the terrorist attack in Jammu and Kashmir on 14 February 2019.

१३० लोक याविषयी बोलत आहेत

मसूद अझहरविरोधातील प्रस्तावात भारताला पाठिंबा देणाऱ्या देशांचेही परराष्ट्र मंत्रालयाने आभार मानले आहेत. दहशतवादी संघटनेच्या नेत्यांविरोधात भारत नेहमीच कठोर भूमिका घेत राहणार आणि या नेत्यांवरील कारवाईसाठी भारताचे प्रयत्न यापुढेही सुरु राहतील, असेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button