breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मल्टीप्लेक्सच्या खाद्यपदार्थ दराविरोधात चिंचवडमध्ये मनसेचे आंदोलन

पिंपरी – मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विकले जातात. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ मल्टीप्लेक्स नेण्यास परवानगी देऊनही त्यास मल्टीप्लेक्समध्ये त्यास बंदी आहे. त्यांच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमधील बिग सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी बिगसिनेमाच्या बाहेरील फलक फाडण्यात आला. तसेच खाद्य पदार्थ विक्री स्टॉलमधील पॉपकॉन फेकत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बिग सिनेमाच्या व्यवस्थापनाला निवेदनही देण्यात आले.

या आंदोलनात राजू साळवे, हेमंत डांगे, अंकुश तापकीर, बाळा दानवले, दत्ता घुले, रूपेश पटेकर, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, संजय यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मल्टीप्लेक्स बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार तसेच मल्टीप्लेक्सच्या कारभारावर संताप व्यक्त केलाय. प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ थिएटरमध्ये नेण्यास बंदी असेल तर मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थांची विक्री का थांबवत नाही, असा सवाल करत खंडपीठाने थिएटर मालक तसेच राज्य सरकारला सुनावले होता. एवढेच नव्हे तर अवाचे सवा दराने विकले जाणारे हे पदार्थ सामान्य दरात विकले गेले पाहिजेत, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले आहे.

या आंदोलनानंतर सचिन चिखले म्हणाले की, आज आम्ही शहरातील सर्वच चित्रपटगृहात जाऊन खाद्यपदार्थांची जादा दरातील विक्री बंद करण्याबाबत निवेदन दिले आहे. जर या मल्टीप्लेक्स व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी केली नाही, तर येत्या काळात मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button