breaking-newsआंतरराष्टीय

मलेशियाचे राजकीय नेते अन्वर इब्राहीम यांची कारागृहातून सुटका

क्वाललांपुर – मलेशियाचे राजकीय नेते अन्वर इब्राहीम यांची आज प्रदीर्घ कारावासातून सुटका करण्यात आली. मलेशियात सत्ताबदल होताच नवे पंतप्रधान महाथिर महंमद यांनी त्यांच्या सुटकेची घोषणा केली होती. ते रूग्णालयातून बाहेर येताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी कारागृहाच्या अधिकाऱ्यांनीच त्यांना रूग्णालयात दाखल केले होते गेले काही दिवस ते तेथेच होते.

70 वर्षीय इब्राहीम यांच्याच नेतृत्वाखालील पक्ष नवीन सरकार मध्ये सत्तेवर असल्याने ते आता थेट सत्तेतही सहभागी होऊ शकतात. पण तुर्तास तरी त्यांनी त्याविषयीची कोणतीही घोषणा केलेली नाही. सन 2015 साली त्यांचे संसदीय सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने त्यांना पुन्हा सत्तेचे पद घ्यायचे असेल तर त्यांना प्रथम संसदेवर निवडून यावे लागणार आहे.

नवे पंतप्रधान महाथिर महंमद यांनी आपण फार तर आणखी दोन वर्षे सरकार चालवू शकू त्यानंतर आपण आपले पद इब्राहीम यांनाच देणार आहोत अशी घोषणा त्यांनी या आधीच केली असल्याने येत्या दोन वर्षात अन्वर इब्राहीम हे मलेशियाचे पंतप्रधानही होऊ शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button