breaking-newsमनोरंजन

मलायका आणि अर्जुनच्या अफेअरवर भडकला सलमान

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या अफेअरचे किस्से गेल्या वर्षभरापासून सिनेमॅगझीन आणि वेवसाईटवर येत आहेत. एकमेकांच्या साथीने बॉलिवूडमधील पार्ट्या आणि लेट नाईट डिनर करतानाचे या दोघांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. आता तर या दोघांनी आपल्यासाठी एक घर देखील विकत घेतल्याचे समजते आहे. मलायका आणि अर्जुन कपूरमधील जवळीक बघून सलमान खान चांगलाच भडकला आहे.

मलायका ही सलमानचा भाऊ अरबाझ खानची पूर्वाश्रमीची पत्नी म्हणजे सलमानची वहिनी आहे. अर्जुनला समजावण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर सलमानने आता अर्जुन कपूर आणि त्याचे पप्पा बोनी कपूर यांना आपल्या घरात येण्यासच मज्जव केला आहे. त्यात अर्जुनवर सलमानचा विशेष राग आहे. कारण मलायकाच्या आगोदर अर्जुन कपूर हा सलमानची बहिण अर्पिता खानला डेट करत होता. नंतर त्याने मलायकाबरोबर सूत जुळवायला सुरुवात केली.

अर्जुनने सलमानची समजूतही काढली होती. पण अरबाझ आणि मलायकाचा घटस्फोट झाल्यावर त्याने पुन्हा मलायकाला डेट करायला सुरुवात केली. त्यामुळेच सलमान जास्त भडकला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button