breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मरिन ड्राईव्हवर जोडप्याचे अश्लील चाळे

मुंबई: मरिन ड्राईव्ह येथे भररस्त्यात दुभाजकावर एका जोडप्याने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एका परदेशी नागरिकाला ताब्यात घेऊन चौकशीनंतर सोडून देण्यात आले. तर सदर महिलेला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

क्वीन्स नेकलेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या मरिन ड्राईव्हवर अनेक जोडपे फिरायला येतात. या परिसरात तरूण-तरुणींची नेहमीच वर्दळ असते. मात्र या जोडप्याने थेट भररस्त्यावरील दुभाजकावर बसून अश्लील चाळे करायला सुरुवात केली. अनेक आंबटशौकीनांनी या जोडप्यांचे फोटो काढले तर काहींनी व्हिडिओ काढून ते व्हायरलही केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या जोडप्यांना ताब्यात घेतले. या दोघांनाही पोलीस ठाण्यात नेण्यात आले. हे दोघे गोव्यातून आल्याचे त्यांच्या चौकशीतून स्पष्ट झाले. मात्र पत्ता आणि नातलगांचा नंबर देण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान, या महिलेचे मानसिक स्वास्थ बिघडलेले असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी तिची रवानगी चेंबूरच्या महिला सुधारगृहात केली. तर संबंधित परदेशी नागरिकाला तंबी देऊन सोडून देण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button