breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मराठा मोर्चाच्या महाराष्ट्र बंदला अनेक संघटनांचा पाठिंबा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्याचाच भाग म्हणून या बंदमध्ये पिंपरी चिंचवडमधील सर्व संघटना व जनतेने सहभागी होवून मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अभिमन्यु पवार यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला शहरातील पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना, कष्टकरी हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, असंघटीत कामगार संघटना यांनी पाठिंबा दिला असुन या संघटना बंदमध्ये सक्रिय सहभागी होणार असल्याचे सांगितले.
पवार यांनी माहिती दिली की, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी अनेक वर्षापासून असताना मागच्या प्रत्येक सरकारने समाजाची फसवणूकच केली.२०१४ च्या निवडणुकांमध्ये आम्हाला सत्ता द्या आम्ही मराठा समाजाला आरक्षण देतो असे त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात आणि भाजपाच्या जाहीरनाम्यात सांगितले होते. मराठा समाजाने त्यांच्या फसव्या भुलथापांना बळी पडून भाजपाला मोठ्या प्रमाणात मतदान करून सत्तेवर आणले; मात्र सत्ता येताच मुख्यमंत्र्याना मराठ्यांना दिलेल्या आश्‍वासनांचा सोयीस्करपणे विसर पडला. आपल्या मागणीसाठी मराठा समाजाने प्रचंड मोठे मोठे मोर्चे काढले तरी आरक्षणाच्या आणि इतर मागण्याच्या संदर्भात सरकार काहीच करत नसल्यामुळे मराठा समाज आता प्रचंड संतापलेला आहे.
मागच्या एक महिन्यापासून महाराष्ट्रात  आक्रमकपणे आंदोलन करत असताना आमच्या वीस पेक्षा अधिक तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्मबलिदान दिलेल आहेत. तरीही मुख्यमंत्र्यानी अनेक बेजबाबदार विधाने केलेली आहेत. यावरुन सरकार मराठा आरक्षणा संदर्भात किती गंभीर आहे हे लक्षात येत. आमच्या मागण्यासंदर्भात त्यांच्याकडे कालबद्ध, नियोजनबद्द आणि कृतीशील कार्यक्रम नाही. त्यांनी केलेल्या निवेदनामध्ये एक वाक्यता नाही. त्यामुळे आम्ही  मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंदच आवाहन केलेले आहे. हा बंद अत्यंत शांततेच्या मार्गाने होणार असून या बंदमध्ये सर्वानी सहभागी होवून सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button