breaking-newsमुंबई

मराठा आरक्षणावर हायकोर्टात आज सुनावणी

  • सरकारच्या भूमीकेवर सर्वांचे लक्ष 

मुंबई – आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाचे सुरू असलेले आंदोलन आणि त्याला लागलेले हिंसक वळण्याच्या पार्श्‍वभूमीवर गेली दोन वर्षे उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षण याचिकेवर आज सुनावणी होत आहे. याचिकाकर्त्यांच्या विनंतीनुसार न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. याप्रसंगी राज्य सरकार कोणती भुमीका घेणार यावर साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी घेण्यात यावा, जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, यासाठी सामाजीक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात डिसेंबर 2017 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

मागिल सुनावणीच्या वेळी न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्‍त करून राज्य सरकारला आयोगाचा अहवाल 31 जुलैपर्यत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकार उद्या न्यायालयात काय भूमिका मांडणार यावर साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button