breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अर्धापूर (नांदेड) –  पिंपळगाव (ता. अर्धापूर, जिल्हा नांदेड) येथील शेतकरी प्रल्हाद कल्याणकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ही घटना शुक्रवारी (ता. 27) रात्री  बारा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी नांदेड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. तसेच आपल्या शर्टाच्या खिशावरही तसा  उल्लेख केला आहे.  या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी (ता. 28) सकाळी उमटले असून संतप्त जमावाने पिंपळगाव पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन करून वाहनांवर दगडफेक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button