breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मराठा आंदोलनात दाखल केसेस बार असो. मोफत लढणार

  • आंदोलनाला पाठिंबा : अध्यक्ष अॅॅड. सुभाष पवार यांची माहिती

पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे जिल्हा बार असोसिएशने मराठा समाज आंदोलनास पाठिंबा दिला आहे. या काळात मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल केसेस बार असोसिएशनकडून मोफत लढविल्या जाणार असल्याची माहिती अध्यक्ष अॅॅड. सुभाष पवार यांनी दिली.

मराठा समाजाने आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्हा बार असोसिएशननेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आंदोलनास पाठिंबा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. या आंदोलनात मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल असलेल्या केसेस मोफत लढल्या जाणार आहेत. ज्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांनी याबाबतची माहिती पुणे जिल्हा बार असोसिएशनला द्यावी, असे आवाहन अॅॅड. पवार यांनी यावेळी केले आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button