breaking-newsमनोरंजन

मनोरंजक ‘थापाड्या’

वेळ प्रसंगी खोटे बोलणे, हा माणसाचा सहज स्वभाव आहे. काहींना तर सतत खोटेच बोलण्याची सवय असते. आपल्या सभोवताली देखील असे अनेक थापाडे असतात, अजित बाबुराव शिरोळे दिग्दर्शित, रॉमकॉन शैलीतील ‘थापाड्या’ चित्रपटातून एक भन्नाट थापाड्या आपल्या भेटीला आहे.

‘थापाड्या’ ही देवदत्त (अभिनय सावंत) भोवती गुंफण्यात आलेली कथा आहे. तो एक उत्तम ढोलकीपटू, शाहीर आहे. अगदी लहान वयात त्याने मोठे कार्य करत शाहीरीत आपला अमीट ठसा उमटविला आहे. आपल्या कलेवर नितांत प्रेम करणाऱ्या देवदत्तवर त्याची सहकलाकार शलाका (मानसी मुसळे) हिचे जीवापाड प्रेम आहे. मात्र अचानक काही दिवस कुठे गायब होतो, याचा कुणालाच पत्ता लागत नाही, तर विक्रम हा युवा उद्योजिंका सौम्या पारेख (ब्रिन्दा पारेख) हिच्याशी विवाहाचे नाटक करून तिची फसवणूक करतो, याच काळात या विक्रमचा शोध राज्यातील एक वजनदार मंत्री (मोहन जोशी) सुद्धा घेत आहेत. देवदत्त कुठे निघून गेला? विक्रम आणि देवदत्त चा काही संबंध आहे का? या प्रश्नांच्या उत्तरासाठी ‘थापाड्या ‘ चित्रपटगृहात जाऊन बघायला हवा.

दिग्दर्शक अजित शिरोळे यांनी ‘‘थापाड्या’ च्या माध्यमातून मनोरंजनाचे एक परिपूर्ण पॅकेज देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची कथा फार नाविन्यपूर्ण नसली तरी प्रेक्षक कुठेही कंटाळत नाही, चित्रपटातील संवाद चांगले आहेत. पटकथेवर आणख्ही काम करण्याची गरज होती. धमाल विनोद, सस्पेन्स याची मांडणी चांगली झाली आहे. चित्रपटाला पंकज पडघन, चैतन्य आडकर यांचे संगीत लाभले आहे. रोमँटीक सॉंग, भक्तिरसातील गण आणि शृंगारिक लावणी अशी विविध शैलींतील गाणी चित्रपटात आहेत.

कलाकारांच्या अभिनया बद्दल सांगायचे तर अभिनेता अभिनय सावंतने आपल्या कौशल्याने भूमिकेतील वैविध्य जपले आहे. अभिनेत्री मानसी मुसळेची लावण्यांमधील अदाकारी प्रेक्षकांना घायाळ करते. सोनाली गायकवाडने आपल्या पहिल्याच चित्रपटात उत्तम कामगिरी केली आहे, मराठीत पदार्पण करणाऱ्या ब्रिंदा पारेखची भूमिकाही लक्षात राहणारी आहे. मोहन जोशी यांच्यासह कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, दीपक करंजीकर, सुनील गोडबोले, विनीत भोंडे, संतोष रासने, प्रदीप कोथमिरे, अण्णा साळुंखे या कलाकारांनी चित्रपटात धमाल आणली आहे.

एकंदरीत सांगायचे तर ‘थापाड्या’ हा एक रोमान्स, कॉमेडी आणि सास्पेन्सचा तडका असलेला चित्रपट आहे. चित्रपटाचे संगीत आणि कलाकारांचा चांगला अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही.

चित्रपट – थापाड्या

निर्मिती – भाउसाहेब भोईर, शरद म्हस्के

दिग्दर्शक – अजित शिरोळे

संगीत – पंकज पडघन, चैतन्य आडकर

कलाकार – अभिनय सावंत, मानसी मुसळे, सोनाली गायकवाड, ब्रिंदा पारेख, मोहन जोशी, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button