breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘मनिकर्णिका’विरोधात गुन्हा दाखल करा!

राणी लक्ष्मी बाईंच्या वारसाचा न्यायालयात अर्ज

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिची मुख्य भूमिका असलेल्या ‘मनिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज उल्हासनगर येथील दंडाधिकारी न्यायालयात करण्यात आला.

राणी लक्ष्मीबाई यांच्या वारसांपकी विवेक तांबे यांनी हा अर्ज दाखल केला असून याप्रकरणी ४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याची गाथा रुपेरी पडद्याावर आणणारा ‘मनिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी २५ जानेवारीला प्रदíशत होणार आहे. मात्र या चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांबाबत ढवळाढवळ केली असून अनेक चुकीचे संदर्भ त्यातून लोकांसमोर येणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाविरोधात सरकारी नोंदींत फेरफार केल्याप्रकरणी तसेच लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तांबे यांनी अर्जाद्वारे केली आहे.

राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म वाराणसी येथे १९ नोव्हेंबर १८३५ साली झाला होता. मात्र या चित्रपटातील पोस्टरवर त्यांचे जन्मवर्ष १८२८ असल्याचे नमूद केले आहे. पोस्टरवर दिलेली माहिती चुकीची असल्याचे आपण  निर्मात्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. चूक मान्य करत ती निदर्शनास आणून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले, मात्र त्यानंतरही झालेल्या कार्यक्रमांमधून तसेच चित्रपटातही १८२८हेच जन्मवर्ष म्हणून दाखवण्यात येत आहे. ही लोकांची फसवणूक असल्याची तक्रार विवेक तांबे यांनी केली.

यासंदर्भात, उल्हासनगरच्या  पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे न्यायालयात अर्ज केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चित्रपट निर्मात्यांना जाणीव करून देऊनही त्यांनी योग्य ते बदल केले नाहीत, असेही विवेक तांबे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button