breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘मनसे आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे पक्षाची ध्येयधोरणे ‘घराघरात’

  • विधानसभानिहाय कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर दिला भर
  • विधानसभा निवडणूक समोर ठेवून राबविला उपक्रम

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा निवडणुका लढविणार नसल्याचा निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी घेतला असला तरी शहरातील मनसेच्या पदाधिका-यांनी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षवाढीसाठी विशिष्ट मोहीम हाती घेतली आहे. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात ‘मनसे आपल्या दारी’ उपक्रम राबवून मनसैनिकांनी कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतल्या आहेत.

  • पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभारी किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात हा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील सर्व मनसैनिकांच्या घरोघरी जाऊन कार्यकर्ते, शहारातील सार्वजनिक मंडळे आणि ज्येष्ठ नागरिक संघांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या भेटीगाठींमध्ये पक्षाची ध्येय धारणे सर्वांना समजून सांगण्यात आली. यामध्ये गेली १५ ते २० दिवस पिंपरी, भोसरी आणि चिचंवड अशा तीनही विधानसभा पिंजून काढल्या आहेत. यामध्ये ३ हजार ५०० कार्यकर्ते व मनसैनिक यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या, अशी माहिती मनसेनेचे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी सांगितली.

काल सोमवारी (दि. 18) पिंपरी विधानसभा मतदार संघात मनसैनिकांनी हा उपक्रम राबविला. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. तर, नागरिकांशी संवाद साधून आगामी कार्यकाळात पक्ष कोणती भूमिका घेणार याची माहिती सांगण्यात आली. तत्पुर्वी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचा दौरा पदाधिका-यांनी पूर्ण केला होता. पिंपरी विधानसभेत या उपक्रमाची काल सांगता करण्यात आली.

  • उपक्रमाचे नियोजन शहर उपाध्यक्ष बाळा दानवले, राजु साळवे, महिला सेना अध्यक्ष अश्विनी बांगर, उपअध्यक्ष सिमा बेलापुरकर, अनिता पांचाळ, संगिता देशमुख, स्नेहल बांगर, रुपाली गिलबिले, सुजाता काटे, मिना गटकळ, विभाग अध्यक्ष विशाल मानकरी, राहुल जाधव, मयुर चिंचवडे, शाम जगताप, संजय यादव, दत्ता देवतरासे, सचिव रुपेश पटेकर, विद्यार्थी सेनाध्यक्ष हेंमत डांगे, अनिकेत प्रभु, प्रतिक शिंदे, विकास कदम, रोहित काळभोर, सुशिल पोतदार, नितीन चव्हाण, पंकज दळवी, के. के. कांबळे, अक्षय नाले, ओकांर पाटोळे, मिलिंद सोनवणे, सुधीर जम, एँल्केस मोजेस, करण मुर्ती यांनी केले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button